स्त्री शोषणाविरुद्ध आवाज
बीजिंगमधल्या चौथ्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत स्त्रीशोषणाची जी व्याख्या केली, त्यातल्या प्रत्येक मुद्द्याला ग्राह्य धरून स्त्री आधार केंद्र महिलांच्या शोषणाविरोधात आवाज उठवण्याच काम करत आलेलं आहे. या व्याखेप्रमाणे स्त्रीशोषणामध्ये खाजगी किंवा सार्वजनिक ठिकाणी स्त्रियांवर लिंगभेदामुळे केला जाणारा कोणत्याही प्रकारचा शारीरिक किंवा मानसिक अत्याचार, प्रत्यक्ष अत्याचार अथवा त्याचा धाक दाखवाणं, कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करणं, स्वतंत्र हिरावून घेण याचा समावेश होतो.