लिंगभेदाच्या अन्याया विरोधातील समाज निर्माण करण्यासाठी स्त्री आधार केंद्राच्या कामासाठी आपलाही योगदान खूप मोलाचा आहे. म्हणूनच स्त्री आधार केंद्र आपल्यातील दातृत्वाला आवाहन करत आहे.

संकेत स्थळावर स्वागत आहे

पुरुषप्रधान संस्कृतीला शह देण्यासाठी आणि महिलांवर होणा-या अत्याचाराला प्रत्युतर देण्यासाठी काही महिला उत्स्फुर्तपणे एकत्र आल्या. स्त्रीला दुय्यम लेखणा-या समाजातल्या प्रवृत्तीला ठामपणे नकार देण्याची आतंरिक इच्छा प्रत्येक स्त्रीच्या मनात खरतर नैसर्गिकरित्या असतेच. याच खोलवर दडलेल्या इच्छेला अभिव्यक्त करण्यासाठी एक व्यासपीठ स्त्रियांना मिळवून देण्याच त्यांनी ठरवलं. स्वतःचे हक्क आणि अधिकार जाणून घेऊन आपल आयुष्य सुरक्षित आणि सुखकर बनवू इच्छिणा-या महिलांना दिशा देण्याच काम त्यांनी सुरु केलं. आपले विचार आणि भावना मनमोकळेपणानं व्यक्त करण्यासाठी, त्यांची देवाणघेवाण करण्यासाठी स्त्रियांना हक्काची जागा मिळवून देण्यासाठी धडपड केली. जिथे आत्मविश्वासानं आणि मुक्तपणानं, निर्भयतेनं आपल मत व्यक्त करता येईल अस ठिकाण मिळवून दिलं. पुरुषांच्याइतकीच किंबहुना त्यांच्या बरोबरीन स्त्रियांना सन्मानाची, आदराची, स्नेहाची वागणूक, दिलासा देणारं एक केंद्र यामुळे मिळालं. आणि या सगळ्या धडपडीत एका बाजूला संस्था उभी राहायला लागली तर एकीकडे या स्त्रियांमध्ये आत्मविश्वास, निश्चय, निर्भयता या गोष्टी वाढत गेल्या.
या सगळ्याची सुरुवात झाली १९८० च्या दशकाच्या सुरुवातीला पुण्यातल्या एका उपनगरात.
स्त्री आधार केंद्राच्या स्थापनेची नेमकी तारीखवार सांगण तसं कठीण आहे. पण सार्वजनिक विश्वस्तसंस्था म्हणून सोसायटी रजिस्ट्रेशनच्या अंतर्गत संस्थेची अधिकृत नोंदणी झाल्याची तारीख तिचा स्थापनदिन म्हणून सांगता येईल. पण खर तर अशा सामाजिक संस्था काही ठरवून अमुक एका ठरवूक दिवशी स्थापन झाल्या आणि त्या एका विशिष्ठ चौकटीतच काम करतील असं मानण चुकीच ठरेल. याचं मुख्य कारण म्हणजे समाजात घडणा-या काही विघातक घटनांच्या विरोधात किंवा चांगल्या कामामध्ये मदत करण्यासाठी म्हणून काही लोक एकत्र येतात आणि काम करायला सुरुवात करतात. हि सगळी प्रक्रिया काळजीपूर्वक, खोलवर समजून घेऊन मगच अशा स्त्री आधार केंद्रासारख्या संस्थांची निर्मिती कशी होते हे आपल्याला समजेल. एखाद्या नदीसारख या संस्थांचं काम चालतं.अनेक नवनवीन विचारप्रवाह, कार्यकर्ते, स्वयंसेवक त्याला येउन मिळत असतात, अनेक जणांचं वेगवेगळ्या प्रकारच योगदान मिळतं आणि संस्था वाढत जाते.
स्त्री आधार केंद्राच्या वाढीची प्रक्रियाही अशीच काहीशी घडत गेली.

काळ वैशिष्ट्यं घडलेले बदल
मोबिलायझेशन सूक्ष्म पातळीवर काम, सामुदायिक उपक्रम, महिलांमध्ये शिक्षणाचा प्रसार, तसच त्यांची जागरुकता वाढवणे. दबाव गट म्हणून ओळख झाली आणि कोअर टीमची निर्मिती झाली.
संघटनांची उभारणी महिलांना पाठींबा देण्यासाठी गटाची स्थापना, अधिक वैशिष्ठपूर्ण काम, संस्थेमध्ये महिलांसाठी रोजगारनिर्मिती महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी स्टाफची नेमणूक
आलेख उंचावणे आणि प्रसार वाढणे अनेक व्यक्ती, संस्था यांच्याबरोबरचे व्यवहार, संबंध वाढले, संस्थेचा पसारा वाढायला सुरुवात झाली. जास्तीत जास्त महिलांना जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी कृतीशील.
धोरणात्मक आणि सल्लागार समिती राज्य पातळीवरील धोरणं ठरावामध्ये सहभाग, तसंच राष्टीय आणि अंतरराष्ट्रीय पातळीवर संबंध लैंगिक भेदभावाविरुद्ध राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर सूचना देऊन स्त्रियांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न

जवळपास १६ वर्ष स्त्री आधार केंद्राचं काम या चार टप्प्यामधून चालू होतं, प्रत्येक टप्पा साधारणपणे चार वर्षाचा होता असं म्हणता येईल. या सगळ्या काळात श्रीमती नीलमताई
गो-हे यांचं कार्यक्षम नेतृत्तव केंद्राला मिळालं. सध्या त्या केंद्राच्या सन्माननीय अध्यक्षा आहेत.

स्त्रीवादी भूमिका म्हणजे शोषणाविरुद्धाची जाणीव :
स्त्रीला स्वतःच्या भावनांची, विचारांची, हक्काची, अधिकारांची, तिच्यातल्या क्षमतांची, तिच्या भूमिकेची, तिच्या आजूबाजूच्या परिस्थितीची पुरेपूर जाणीव करून देण म्हणजेच स्त्रीवादी असण अशी स्त्री आधार केंद्राची भूमिका आहे. स्त्रीवादी, आर्थिक स्थर आणि जातीविषमता अनेक गोष्टी ज्या समाजात भेदभाव निर्माण करतात अशा गोष्टींची जाणीव करून देण हे स्त्री आधार केंद्राला आपलं कर्तव्य वाटतं.
समाजाची रचना स्त्री मूल्यांच्या आधारावर करणं हेच संस्थेच प्रमुख उद्दिष्ठ आहे. त्यामुळेच संस्थेमार्फत चालवले जाणारे निरनिराळे कार्यक्रम आखताना खालील चार मुल्यांवर प्रामुख्यान भर दिला जातो.

Copyright © 2013-2019. All rights reserved.