लिंगभेदाच्या अन्याया विरोधातील समाज निर्माण करण्यासाठी स्त्री आधार केंद्राच्या कामासाठी आपलाही योगदान खूप मोलाचा आहे. म्हणूनच स्त्री आधार केंद्र आपल्यातील दातृत्वाला आवाहन करत आहे.

आपतग्रस्त महिलांसाठी विशेष सहकार्य


नैसर्गिक किंवा मनुष्यनिर्मित संकट ओढवतात; अशा वेळीदेखील त्यात अडकलेल्या महिलांना विशेष मदत पुरवण्याचं काम स्त्री आधार केंद्र करत आलेल आहे. १९९३ साली महाराष्ट्रात झालेल्या भीषण भूकंपाच्या वेळीही केंद्राने तेथील महिलांना इतर मदतीबरोबरच मानसिक आधारही देण्याचं काम केलं. संकटग्रस्त महिलांच्या पुनर्वसन आणि सक्षमीकरणाच्या कामामध्ये केंद्राचा नेहमीच पुढाकार असतो.

गुजरातमधल्या भुकंपानंतरही त्या भागातल्या १३ गावांमधल्या महिलांना सर्वतोपरी सहकार्य देण्याचं काम केंद्रानं केलं आहे. त्यामध्ये कायदेशीर सल्ला, मानसिक आधार देण्यासाठी समुपदेशन याही गोष्टींचा समावेश होता. सरकारी मदतीत कुठेही महिलांवर अन्याय होणार नाही, त्यांचे हक्क सुरक्षित राहतील याकडे केंद्रानं कटाक्षानं लक्ष दिलं.

आमची प्रकाशने

राज्यातल्या छोट्यामोठ्या महिला गटांना स्त्री आधार केंद्रानं केलेल्या कामांची माहिती कळावी तसंच इतरही अनेक उपयुक्त माहिती या महिलांना कळावी या हेतूने स्त्री आधार केंद्राने मुद्रित तसंच दृक - श्राव्य माध्यामातून काही साहित्य प्रकाशित केलं आहे.
अधिक वाचा

प्रकल्प

ज्या उद्देशाने स्त्री आधार केंद्राची स्थापना झाली, मुख्यत्वे तेच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन केंद्राचे प्रकल्प आखारलेले आहेत. पण सुरवातीपासून सातत्याने कौटुंबिक समुपदेशाने हा स्त्री आधार केंद्राचा मुख्य प्रकल्प राहिलेला आहे.
अधिक वाचा

आव्हान

लिंगभेदाच्या अन्याया विरोधातील समाज निर्माण करण्यासाठी स्त्री आधार केंद्राच्या कामासाठी आपलाही योगदान खूप मोलाचा आहे. म्हणूनच स्त्री आधार केंद्र आपल्यातील दातृत्वाला आवाहन करत आहे. आपली देणगी खालील ठिकाणी स्वीकारली जाईल.
अधिक वाचा

Copyright © 2013-2019. All rights reserved.