लिंगभेदाच्या अन्याया विरोधातील समाज निर्माण करण्यासाठी स्त्री आधार केंद्राच्या कामासाठी आपलाही योगदान खूप मोलाचा आहे. म्हणूनच स्त्री आधार केंद्र आपल्यातील दातृत्वाला आवाहन करत आहे.

संकेत स्थळावर स्वागत आहे

पुरुषप्रधान संस्कृतीला शह देण्यासाठी आणि महिलांवर होणा-या अत्याचाराला प्रत्युतर देण्यासाठी काही महिला उत्स्फुर्तपणे एकत्र आल्या. स्त्रीला दुय्यम लेखणा-या समाजातल्या प्रवृत्तीला ठामपणे नकार देण्याची आतंरिक इच्छा प्रत्येक स्त्रीच्या मनात खरतर नैसर्गिकरित्या असतेच. याच खोलवर दडलेल्या इच्छेला अभिव्यक्त करण्यासाठी एक व्यासपीठ स्त्रियांना मिळवून देण्याच त्यांनी ठरवलं. स्वतःचे हक्क आणि अधिकार जाणून घेऊन आपल आयुष्य सुरक्षित आणि सुखकर बनवू इच्छिणा-या महिलांना दिशा देण्याच काम त्यांनी सुरु केलं. आपले विचार आणि भावना मनमोकळेपणानं व्यक्त करण्यासाठी, त्यांची देवाणघेवाण करण्यासाठी स्त्रियांना हक्काची जागा मिळवून देण्यासाठी धडपड केली. जिथे आत्मविश्वासानं आणि मुक्तपणानं, निर्भयतेनं आपल मत व्यक्त करता येईल अस ठिकाण मिळवून दिलं. पुरुषांच्याइतकीच किंबहुना त्यांच्या बरोबरीन स्त्रियांना सन्मानाची, आदराची, स्नेहाची वागणूक, दिलासा देणारं एक केंद्र यामुळे मिळालं. आणि या सगळ्या धडपडीत एका बाजूला संस्था उभी राहायला लागली तर एकीकडे या स्त्रियांमध्ये आत्मविश्वास, निश्चय, निर्भयता या गोष्टी वाढत गेल्या.

अधिक वाचा

संदर्भ आणि संवाद साधने

स्त्री आधार केंद्र लोकसत्ता लेख भाग - १ व भाग - २

स्त्री आधार केंद्र लोकसत्ता लेख भाग - ३ व भाग - ४

भिंतीमागचा आक्रोश

निर्भय दृष्टी अभ्यास

आमची प्रकाशने

राज्यातल्या छोट्यामोठ्या महिला गटांना स्त्री आधार केंद्रानं केलेल्या कामांची माहिती कळावी तसंच इतरही अनेक उपयुक्त माहिती या महिलांना कळावी या हेतूने स्त्री आधार केंद्राने मुद्रित तसंच दृक - श्राव्य माध्यामातून काही साहित्य प्रकाशित केलं आहे.
अधिक वाचा

प्रकल्प

ज्या उद्देशाने स्त्री आधार केंद्राची स्थापना झाली, मुख्यत्वे तेच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन केंद्राचे प्रकल्प आखारलेले आहेत. पण सुरवातीपासून सातत्याने कौटुंबिक समुपदेशाने हा स्त्री आधार केंद्राचा मुख्य प्रकल्प राहिलेला आहे.
अधिक वाचा

आव्हान

लिंगभेदाच्या अन्याया विरोधातील समाज निर्माण करण्यासाठी स्त्री आधार केंद्राच्या कामासाठी आपलाही योगदान खूप मोलाचा आहे. म्हणूनच स्त्री आधार केंद्र आपल्यातील दातृत्वाला आवाहन करत आहे. आपली देणगी खालील ठिकाणी स्वीकारली जाईल.
अधिक वाचा

छायाचित्र विभाग



Orange Day
Latur Workshop
Solapur Workshop
Dhule Karyashala

वृत्तपत्र विभाग



"#MEETOO"बाबत उघडपणे काम
कल्पना गिरी प्रकरण
महिलांच्या सबलीकरणासाठी कायदे
महिलांच्या सबलीकरणासाठी कायदे
आणखी पहा

स्त्री आधार केंद्राचे कार्यक्रम

स्त्री शोषणाविरुद्ध आवाज

बीजिंगमधल्या चौथ्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत स्त्रीशोषणाची जी व्याख्या केली, त्यातल्या प्रत्येक मुद्द्याला ग्राह्य धरून स्त्री आधार केंद्र महिलांच्या शोषणाविरोधात आवाज उठवण्याच काम करत आलेलं आहे. या व्याखेप्रमाणे स्त्रीशोषणामध्ये खाजगी किंवा सार्वजनिक ठिकाणी स्त्रियांवर लिंगभेदामुळे केला...

01

स्त्रियांना मुख्य प्रवाहात आणणं

स्त्रियांचे प्रश्न हे सा-या समाजाचे प्रश्न आहेत, त्यांना मुख्य प्रवाहात आणून त्यांच्यावर उपाययोजना करणं याचा स्त्री आधार केंद्रान सतत आग्रह धरला आहे. संपूर्ण देशाची धोरणं ठरवताना त्यात या प्रश्नांचा विचार झालाच पाहिजे. कोणत्याही देशानं राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली विकसनशील धोरणं...

02

आपतग्रस्त महिलांसाठी विशेष सहकार्य

नैसर्गिक किंवा मनुष्यनिर्मित संकट ओढवतात; अशा वेळीदेखील त्यात अडकलेल्या महिलांना विशेष मदत पुरवण्याचं काम स्त्री आधार केंद्र करत आलेल आहे. १९९३ साली महाराष्ट्रात झालेल्या भीषण भूकंपाच्या वेळीही केंद्राने तेथील महिलांना इतर मदतीबरोबरच मानसिक आधारही देण्याचं काम केलं. संकटग्रस्त...

03

महिला सक्षमीकरण

महिलांनमधल्या क्षमता ओळखून त्या विकसित करण्यासाठी स्त्री आधार केंद्रानं महाराष्ट्रातील १० जिल्ह्यांमध्ये महिला विकास मंचाची स्थापना केली आहे. स्थानिक पातळीवर महिलांना संघटीत करून स्थानिक पातळीवरचे त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी हे मंच काम करतात. या मंचामध्ये महिला आपले...

04

संपर्क साधा

संपर्कात रहा
फोन

०२० - २४३९४१०४

फॅक्स

०२० - २४३९४१०३

पत्ता

स. नं. १४, घर नं. १४५/१, गणेश नगर, माहेरवाट आश्रमाजवळ,
वडगाव धायरी, पुणे - ४११०४१ महाराष्ट्र (भारत)

तुमच्या प्रतिक्रिया इमेल द्वारे पाठवा

Copyright © 2013-2019. All rights reserved.