सर्वांसाठी समानता न्याय अनुकुलता सर्वसमावेशकता आणि सहकार्य
कोणत्याही प्रकारचा अन्याय आणि दुय्यम वागणूक यांच्या विरोधात पद्धतशीरपणे सातत्यानं लढा देत राहाण हेच स्त्री आधार केंद्राचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणता येईल.
एकत्र येउन काम करणं महत्तवाचं आहे. एकत्र येण्यातूनच संस्थेची उभारणी होत असते. हे फक्त एक साधन नाही तर विचार व्यक्त करण्यासाठी, विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी असलेलं एल कृतीशील व्यासपीठ आहे.
१९९५ सालातल्या सप्टेंबर महिन्यात बीजिंग येथे भरलेली चौथी आंतरराष्ट्रीय महिला परिषद स्त्री आधार केंद्राच्या प्रवासातील एक मैलाचा दगड ठरली. या परिषदेच्या सुरुवातीपासून ते संपूर्ण परिषद पार पडेपर्यंत आणि त्यानंतरच्या काळात स्त्री आधार केंद्रानं त्यातल्या कार्यक्रमात, प्रकल्पामध्ये मोठी महत्तवपूर्ण भूमिका बजावली.
१९९७ - ९८ साली केंद्रानं पुढच्या १० वर्षामध्ये करायच्या कामांची दिशा निश्चित करण्यासाठी काही योजना ठरवल्या.
१९९९ साली केंद्राला युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक सोशल कौन्सिलकडून मान्यता मिळाली. यामुळे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर स्त्रियांना मुलभुत प्रश्नांसाठी काम करायला केंद्राला मिळालेलं ते एक प्रकारचं प्रोत्साहन होतं. केंद्रानं तोपर्यंत केलेल्या कामाला मिळालेली ती मोठीच पावती होती.
Copyright © 2013-2019. All rights reserved.