स्त्रियांना मुख्य प्रवाहात आणणं
स्त्रियांचे प्रश्न हे सा-या समाजाचे प्रश्न आहेत, त्यांना मुख्य प्रवाहात आणून त्यांच्यावर उपाययोजना करणं याचा स्त्री आधार केंद्रान सतत आग्रह धरला आहे. संपूर्ण देशाची धोरणं ठरवताना त्यात या प्रश्नांचा विचार झालाच पाहिजे. कोणत्याही देशानं राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली विकसनशील धोरणं आखताना स्त्रियांच्या समस्या लक्षात घेऊनच ती आखली पाहिजेत. स्त्रियांचे प्रश्न स्वतंत्रपणे न हाताळता राजनीतीच्या मुख्य प्रवाहामध्ये या प्रश्नावर विचार व्हावा हि स्त्री आधार केंद्राची मुख्य भूमिका आहे.
विकासाची धोरणं आखताना विशेष लक्ष देण गरजेच आहे. तसेच शक्य तितक्या व्यापक प्रमाणावर हि धोरणं राबवल्यास त्याचा फायदा जास्तीत जास्त महिलांना मिळेल. मुलभूत विकास संस्था आणि ही विकसनशील धोरणं त्यांच्यातील अंतर कमी करण्याच्या दृष्टीने आणि त्यांच्यातील समन्वय साधण्यासाठी स्त्री आधार केंद्रासारख्या संस्था योग्य ती भूमिका बाजू शकतात. त्यामुळेच महाराष्ट्र शासनाच्या महिलाविषयक धोरणनिर्मितीत स्त्री आधार केंद्राचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे.